Product Description
आत्म्याच्या मदतीनं गाठा यशोशिखर
‘तुम्ही आणि तुमचा आत्मा’ हे असं पहिलं-वहिलं पुस्तक आहे, ज्यात मनुष्यजीवनातल्या सर्वश्रेष्ठ शक्तीचं, म्हणजेच आत्म्याचं अत्यंत सोप्या, ओघवत्या भाषेत सविस्तर वर्णन केलेल आहे. ‘मी मन आहे’ या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आणि स्पिरिच्युअल सायकोडायनॅमिक्सचे प्रणेते दीप त्रिवेदी यांनीच हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात मनुष्याच्या अंतरंगात स्थित असलेल्या आत्म्याला जागं करण्याचे फॉरम्युले आहेत …सोबत आत्म्याचं भगवद्गीतेच्या आधारे केलेलं वर्णनही आहे. इतकंच नाही तर, या पुस्तकात आत्मशक्ती जागृत करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आहे, तुम्ही तुमच्या आत्म्याच्या किती निकट आहात, हे जाणून घेण्याच्या सोप्या चाचण्या आणि आत्म्याच्या निकट कसं जायचं, हे जाणून घेण्याची सोपी सूत्रंही आहेत. थोडक्यात, या पुस्तकातून आत्म्याच्या ज्या अमर्याद शक्तीं आहेत, त्यांच्या रहस्यांवरून पडदा उचलण्यात आलेला तर आहेच, पण एक सुंदर-दिमाखदार आयुष्य कसं जगायचं याबाबत मार्गदर्शनही केलेलं आहे.
स्वतःला, स्वतःच्या सिस्टिमला आणि स्वतःच्या आत्म्याला वेगवेगळं ओळखायला शिका.
हे पुस्तक मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही उपलब्ध आहे.